Visitors :   Web Counter
   


LATEST NEWS
 • News Title
  News description goes here...
  More...
   
  News Title
  News description goes here...
  More...

संघटनेची ध्येयधोरणे

भारत वर्षाचा इतिहास मराठा समाजाच्या शौर्या शिवाय अपूर्णच आहे. छत्रपती शिवरायांच्या अगोदर हजारो वर्षा पासून मराठा समाज आपल्या शौर्याने व पराक्रमाने सुपरिचित होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या कार्य कर्तृत्वाने मराठा समाजाची कीर्ती सर्वत्र पसरवली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याने व बलिदानाने मराठा समाजाची थोरवी सार्थ केली. ऎतिहासिक कालखंडापासून आज पर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची जबाबदारी स्वीकारून परचक्राचा पाहिला घाव आपल्या शिरावर झेलला. महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मराठा समाजाच्या कर्तृत्वाचा पराक्रमाचा व असीम त्यागाचा इतिहास म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. देश असो वा धर्म त्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावून प्रसंगी शीर तळहाती घेऊन लढला तो मराठा .

जाज्वल्य व गौरवशाली पूर्वजांचा वारसा लाभलेला मराठा समाज आज आधुनिक जगात आपल्या अस्तित्वसाठी हरवलेल्या प्रतिष्ठेसाठी झगडतोय. बहुतांशी समाज दारिद्र्याने पिचून गेलाय खचून गेलाय व गांजला आहे. जगाची भूक भागवणारा समाज आज अर्धपोटी आहे अविकसित आहे. मराठा समजाच्या उत्थानासाठी अखिल भारतीय छावा संघटना वचनबद्ध आहे व "मराठा आरक्षण" सारख्या मुद्यावर झगडताना मराठा समाजाचे व महाराष्ट्रातील सर्व मराठा संघटनांचे नेतृत्व करीत आहे. आजच्या काळातही समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका पार पाडत छावा संघटना मराठा समाजा प्रमाणेच सर्व जाती धर्माच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि न्याय मिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर असते व असेल.त्यामुळे छावा संघटनेत मराठा समाज बरोबर इतर सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते मा.अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समाजाच्या कल्याणासाठी अखंड पणे कार्यरत आहेत .

बघताय काय सामील व्हा !
आलात तर आपल्या बरोबर, नाही आलात तर आपल्या शिवाय!